Advertisement

नागपूर वन विभागाच्या रामटेक उपविभागामार्फत आयोजित वन्यजीव सप्ताहातील चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन


नागपूर वन विभागाच्या रामटेक उपविभागामार्फत आयोजित वन्यजीव सप्ताहातील चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन

नागपूर वन विभागाच्या रामटेक उपविभागामार्फत आयोजित वन्यजीव सप्ताहातील चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन केले. या प्रसंगी बोलताना मी नमूद केले की, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक डोळसपणे आणि परिणामकारकपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. मानव - वन्यजीव संघर्ष हा आपल्या भागात वाढत चाललेला अतिशय गंभीर आणि ज्वलंत प्रश्न असून, यावर प्रचंड प्रमाणात आणि वेळीच काम होणे गरजेचे आहे. 

मानव - वन्यजीव संघर्ष वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे जंगलांतील हिरवळ कमी होणे होय. हिरवळ शेतांमध्ये असल्यामुळे हरिणांसारखे प्राणी अन्नाच्या शोधात शेतांकडे येतात आणि त्यांच्या मागोमाग वाघासारखे वन्य प्राणी सुद्धा या भागात प्रवेश करतात. त्यामुळे संघर्षाच्या घटना घडतात. या समस्येवर उपाय म्हणून जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे, हिरवळ निर्माण करणे, तसेच जलसंधारणाच्या उपाययोजना वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.

माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या विषयाकडे अतिशय गांभीर्याने पाहत आहेत. वनविभागाचे मंत्री महोदय सुद्धा या प्रश्नावर आवश्यक ती पावले उचलत आहेत.


आपण सर्वजण, लोकप्रतिनिधी, सरपंच, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, जेणेकरून मानवी चुकीमुळे वन्यजीव हल्ले घडू नयेत आणि कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये.

तसेच वनक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवत असून, आदिवासी शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठीही शासन प्रयत्नशील आहे.

शेवटी, या सर्व प्रश्नांवर शासन गंभीर असून, सामूहिक प्रयत्न आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून मानव -वन्यजीव संघर्षासह सर्व संबंधित प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

Inauguration of the Wildlife Week seminar and workshop organized by Ramtek Sub-Division of Nagpur Forest Department

#pudhakarsamachar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या